विजय दिन साजरा
डांग सेवा मंडळ,नाशिक संचलित मुल्हेर येथे आज गुरुवार दिनांक 16/12/2022 रोजी "विजय दिन" साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री-नंदन सर होते.आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून कर्नल श्री-उत्तम पाटील(उपाध्यक्ष-अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद ,महाराष्ट्र व गोवा राज्य) लाभलेत.प्रमुख अतिथी म्हणून श्री-अनिलजी पंडित(संचालक,डांग सेवा मंडळ,नाशिक),मा.श्री-रमेशजी देसाई(संघटन मंत्री,अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद ,महाराष्ट्र व गोवा राज्य)तसेच मा.श्री-सुनीलजी पाटील(माजी सैनिक) हे उपस्थित होते.
प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.श्री.रमेशजी देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.श्री-येवला सी.जी.सरांनी प्रमुख अतिथींची ओळख करून दिली.कर्नल श्री-उत्तम पाटील यांनी 1971 च्या बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या व स्वतः अनुभवलेला रक्तरंजित इतिहास शब्दबद्ध केला.तसेच संरक्षण क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधींची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
श्री-मोरे एस.एस.यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.श्री-सुर्यवंशी एम.ए.यांनी आभार मानले.श्री-विसपुते सर,श्री-पठाडे सर,श्री-अग्निहोत्री सर,श्रीमती-सपकाळ मॅडम,श्रीमती-गवांदे मॅडम,श्री-देविदास सुर्यवंशी,श्री-सागर अहिरे,श्री-नरेंद्र चौधरी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.