News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे आज शुक्रवार दिनांक-02/09/2022 रोजी श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न

    

श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
            डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे आज शुक्रवार दिनांक-02/09/2022 रोजी श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न झाली.
      कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे संचालक-श्री.अनिलजी पंडित भाऊसाहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.विद्यालयाचे प्राचार्य-श्री. नंदन सर अध्यक्षस्थानी होते.एकूण 25 विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.परीक्षक म्हणून श्रीमती- सपकाळ ए.व्ही. व श्रीमती-गवळी एन.बी.यांनी काम पाहिले.या स्पर्धेमध्ये कुमारी बत्तीसे विशाखा गोविंद प्रथम,कुमारी-चौधरी दिपाली रघुनाथ -द्वितीय,कुमारी-बागुल सोनाली विजय तृतीय क्रमांक प्राप्त केला.श्री-पंडित सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती-गवांदे मॅडम यांनी केले.श्री-सुर्यवंशी एम.ए. यांनी आभार मानले.
       डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती.हेमालताताई बिडकर,उपाध्यक्ष श्री. दामुजी ठाकरे,सचिव श्रीमती.मृणालताई जोशी यांनी विजेतींचे अभिनंदन केले
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.मोरे सर.श्री-पठाडे सर,श्री-विसपुते सर,श्री-जाधव सर,श्रीमती-ब्राम्हणकर मॅडम, श्रीमती-सपकाळ मॅडम,श्रीमती-गायकवाड मॅडम,श्री नंदुरबारे सर,श्री-रायते सर,श्रीमती.जोशी ताई,श्री- देविदास सुर्यवंशी,श्री. सागर अहिरे,श्री.नरेंद्र नेरकर यांनी परिश्रम घेतले.