जनता विद्यालय मुल्हेर येथे विशाखा समिती स्थापन
डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे आज गुरुवार दिनांक-25/08/2022 रोजी शैक्षणिक वर्षे 2022-23 साठी विशाखा समितीची स्थापना करण्यात आली.
विशाखा समितीच्या अध्यक्षस्थानी श्रीमती. ब्राम्हणकर मॅडम यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्षपदी श्रीमती.गावांदे मॅडम,सचिवपदी श्रीमती.सपकाळ मॅडम,सदस्यपदी श्रीमती.जोशी मॅडम,9 वी ते 12 वी च्या वर्गातील प्रत्येकी 2-2 विद्यार्थिनींची सदस्यपदी निवड करण्यात आली.
विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. ओतारी सर यांनी प्रस्ताविकाच्या माध्यमातून विशाखा समिती स्थापनेमागचा इतिहास सविस्तर सांगितला.श्री-पंडित सर,श्रीमती-ब्राम्हणकर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केलीत.विद्यालयाचे प्राचार्य श्री-नंदन सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन विद्यार्थिनींना त्यांचे अधिकार,जबाबदाऱ्या यांची जाणिव करून दिली.श्रीमती-गावांदे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.श्री. सुर्यवंशी सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.