जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. नंदन सर व पर्यवेक्षक श्री. ओतारी सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 10 वी च्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीत सादर केले. या वेळी विज्ञान छंद मंडळाची कार्यकारणी तयार करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विज्ञान शिक्षक श्री. चौधरी सर, श्री. जाधव एन. के., प्रयोग शाळा सहाय्यक श्री. गीते सर यांनी मनोगत व्यक्त केले.. सूत्रसंचालन श्री. जाधव एस. व्ही. सर यांनी केले.