News Cover Image

नाशिक विभागाचे पदवीधर आमदार मा. सत्यजित तांबे यांची डॉक्टर विजय बिडकर विद्यालय पेठ येथे सदिच्छा भेट.

नाशिक विभागाचे पदवीधर आमदार मा. सत्यजित तांबे यांची डॉक्टर विजय बिडकर विद्यालय पेठ येथे सदिच्छा भेट.
पेठ, ता. 16- डांग सेवा  मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे नाशिक विभागातील पदवीधर आमदार मा. सत्यजीत तांबे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष माननीय हेमलताताई बिडकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डांग सेवा मंडळ संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे असे  गौरवोद्गार साहेबांनी काढले. आमच्या वडीलांपासून या संस्थेची नाळ जोडली गेली आहे, त्यामुळे मी संस्थेच्या कोणत्याही कामात माझे योगदान देईल असे आश्वासन साहेबांनी दिले. या वेळी डांग सेवा मंडळ संस्थेच्या सचिव मा ऍड. मृणालताई जोशी, प्राचार्य पाटील आर.एम., उपप्राचार्य श्रीमती पवार जे पी, उपमुख्याध्यापक सागर ए एम, पर्यवेक्षक केला डी जी, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख श्री वेढणे पी. आर. श्री ढोले सर, श्री काळे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य श्री पाटील आर. एम. सर यांनी केले.